Share

काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी केली कोरोनावर मात, लवकरच डिस्चार्ज मिळणार

Published On: 

पुणे : देशभरात सध्या कोरोनाच्या विळख्यात सर्वसामान्य नागरिकांपासून ते अनेक नेते देखील अडकल्याचे समोर येत आहे. डॉक्टरांच्या मेहनतीमुळे अनेकजण कोरोनावर मात करताना देखील दिसू येत आहेत. यातच आता काँग्रेसचे नेते तसंच खासदार राजीव सातव कोरोनामुक्त झाले असल्याचे वृत्त समोर आले आहे.

तब्बल 19 दिवसांनी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या त्यांच्यावर सामान्य वॉर्डमध्ये देखरेखीखाली उपचार करण्यात येत आहेत. लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचं वृत्त समोर आले आहे.

सातव यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, काही दिवसांची त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईला हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यासाठी लीलावती हॉस्पिटलच्या टीमने पुण्यात येऊन तपासणी केली होती. त्यानंतर पुण्यात त्यांच्यावर उपचार सुरू राहतील, असं स्पष्ट करण्यात आले होते.

उपचाराअंती राजीव सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. अखेरीस 19 दिवसांच्या उपचारानंतर राजीव सातव यांची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यांना लवकरच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!