जालना: जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे जालन्यात आले असता, कोरोनाबाधितांवर अधिक चांगल्या पद्धतीने उपचार करून प्रत्येक रुग्ण बरा होऊन घरी गेला पाहिजे या दृष्टिकोनातून आरोग्यसेवा अधिक दर्जेदारपणे देण्यात यावी. रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवेत कुठलीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला.
रविवारी भोकरदन व राजूर येथील कोविद केअर सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन टोपेंनी रुग्णांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. ४५ वर्षांवरील ५ लाख ५० हजार नागरिक हे कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी पात्र आहे. त्यांना दुसरा डोस जलदगतीने देण्यात येणार आहे. लसीकरण वेगाने होण्यासाठी केंद्र शासनाकडे लसींची मागणी करण्यात आल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी सांगितले.
खासगी दवाखान्यात कोविड बाधितांवर उपचारापोटी आकारण्यात येणाऱ्या देयकांची काटेकोरपणे तपासणी करा. रुग्णांना उपचारापोटी देण्यात येणारी देयके तपासण्यासाठी प्रत्येक खासगी दवाखान्यात परीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रत्येक देयक काटेकोरपणे तपासले जाईल व नागरिकांकडून अधिकचे देयक घेतले जाणार नाही, याची जिल्हा प्रशासनाने दखल घेण्याची सूचनाही पालकमंत्री टोपे यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- बीडमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
- नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही, नवाब मलिकांचा हल्लाबोल
- लॉकडाऊनमध्ये दुकानदारी पडली महागात; बीडच्या मोंढा परिसरात १० दुकाने सील
- राज्य सरकारच्या तपास यंत्रणांवर कोणाचे दडपण आहे?
- राज्य सरकारने तात्काळ मागासवर्गीय समाजाला पदोन्नतीतील आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढावा – खरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

