Share

ट्रोलर्सला प्रतिउत्तर देताना सोनूने केली हद्दपार ; केला अपशब्दांचा वापर

Published On: 

मुंबई : देशात कोरोना सारख्या संकटामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना रक्ताचा तुटवडा देखील जाणवत आहे. यासाठी अनेक स्तरावर रक्तदान शिबिरासारखे कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

अशातच बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगमने सुद्धा रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. मात्र असे असताना सोनू निगमने तोंडावर मास्कचा वापर न केल्यामुळे तो सोशल मीडियावर बराच ट्रोल झाला होता.

सोनू निगमने रक्तदान केल्याचे काही फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. या फोटोमध्ये तो रक्तदान करताना मास्क लावलेला दिसत नव्हता. मात्र दुसऱ्या फोटोमध्ये त्याने मास्क लावला असल्याचे दिसून आले. काही काळ का होईना त्याने मास्क न लावल्याने सोनूला अनेकांनी सोशल मीडियावर सुनावले होते. पण या ट्रोलिंगमुळे सोनू प्रचंड संतापला. आणि ट्रोलर्सला त्याने जबरदस्त प्रतिउत्तर दिले आहे.

ट्रोलर्सला टार्गेट कार्ट त्याने ट्विट केले. ‘इथे (सोशल मीडियावर) आइंस्टाइन बनून फिरणा-यांनो, मला तुमच्याच भाषेत उत्तर देऊ द्या. कारण तुम्ही त्याच लायकीचे आहात. साले गधों, उल्लू के पट्ठों… रक्तदान करताना मास्क लावण्यावी परवानगी नसते. आणखी किती खालच्या दर्जाला जाणार आहात साले लेफ्टिस्ट?’, असे सोनूने ट्विट मध्ये लिहिले आहे. सोनूने अक्षरशः ट्रोलर्सला शिवीगाळ केली आहे. सोनूचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!