नागपूर:- लॉकडाऊन करण्यासंदर्भात सुरूवातीपासूनच दोन विचारधारा आहेत. तुकाराम मुंढे महापालिकेचे आयुक्त असताना ते नेहमीच लॉकडाऊनचे समर्थन करीत, तर पदाधिकारी विरोध करीत. सद्यस्थितीतही कोरोनाशी दोन हात करताना लॉकडाऊन करण्यावरून दोन गट पडल्याचे दिसत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत लॉकडाउनवरून वादळी चर्चा झाली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन करण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार तसेच मेडिकल, मेयोच्या अधिष्ठातांनी जोरदार समर्थन केले. तर, पालकमंत्री नितीन राऊत आणि नोडल अधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी याला विरोध दर्शविला. त्यामुळे लॉकडाउनवरून प्रशासनातच दोन गट पडल्याचे दिसून येते.

यापूर्वी विभागीय आयुक्त संजीवकुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनीही लॉकडाउनला विरोध दर्शविला होता. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असून शहरात सामूहिक संसर्ग वाढला आहे. रुग्णांच्या संख्येचा आलेखही सतत चढा आहे. यामुळे पोलीस, डॉक्टरांवरील ताण वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाउन आवश्यक असल्याची भूमिका पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बैठकीत मांडली.
पूर्वीचे आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी लॉकडाउनला विरोध दर्शविला होता, हे विशेष. मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया व मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनीही पोलीस आयुक्तांच्या भूमिकेचे समर्थन केले. नागरिक घरीच राहिल्याने रुग्णालयांवरील ताण कमी होईल. उपचार करण्याचे सोईचे होईल, असे मत त्यांनी मांडले.
कोरोनाच्या नोडल अधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी मात्र लॉकडाउनला विरोध दर्शवला. यामुळे गरिबांचे हाल होतील. लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात समाजसेवी आणि लोकप्रतिनिधींनी मदत केली. त्यांच्याही मर्यादा आहेत. पूर्वीप्रमाणे आता मदत मिळेलच असे सांगता येत नाही. मलाही फोन, एसएमएस येतात. ते बहुतांशी सधन लोकांचे आहेत. गरिबांचाही विचार झाला पाहिजे. नागरिक घरीच राहिल्याच याचा संसर्ग वाढण्याचा धोका जास्त राहील, असे खोडे म्हणाल्या.
आता लॉकडाउनची वेळ नाही. पूर्वीच करायला पाहिजे होते, असे मत काहींनी मांडले. पालकमंत्री डॉ. राऊत यांनीही लॉकडाउनला नकारात्मता दर्शवत मृत्यूदर आटोक्यात आणण्याच्या सूचना करीत तूर्तास लॉकडाउन होणार नसल्याचे स्पष्ट केले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही, अशी माहिती मिळाली.
महत्वाच्या बातम्या:-
- कुडाळ शहर पुन्हा एकदा लॉकडाउन; कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने प्रशासनाचा निर्णय
- फडणवीस सरकारने घेतलेले शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय ठाकरे सरकारने स्थगित केले – अनिल बोंडे
- ‘दिल्लीत पवारांना हाणले होते ते मंत्री जितेंद्र आव्हाड विसरलेले दिसताहेत’- भाजप आमदार
- लॉकडाऊनला विरोध करत पालकमंत्री म्हणाले मृत्यूदर घटवा
- दोनशे रुपये वसूल करूनही लोक ऐकत नाहीत, अखेर या शहरासाठी गृहमंत्र्यांनी घेतलाहा निर्णय


