मुंबई: एका निवृत्त नौदल अधिकार्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याने त्यांना शिवसैनिकांनी मारहाण केली. त्यात ते जखमी झाले आहे. आता या घटनेवरून विरोधी पक्ष भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना धारेवर धरलंय.यावरच गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर बाळासाहेबांचा एक जूना व्हिडीओ शेयर केला असून ही काळाची गरज असल्याचं म्हटलंय यावर आता राजकारण तापलं असून भाजपने गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
भाजपचे कांदिवलीपुर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर वरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मंत्रीपदावर असताना लोकांचे अपहरण करून मारहाण करणारे जितेंद्र आव्हाड भुरट्या गुंडगिरीचे समर्थन करणारच. मागे दिल्लीत एका तरुणाने पवारांना हाणले होते ते आव्हाड विसरलेले दिसतायत. त्याचेही समर्थन करा’ अशा शब्दांत भातखळकरांनी आव्हाडांना फटकारले.
माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांकडून समर्थन…
मंत्रीपदावर असताना लोकांचे अपहरण करून मारहाण करणारे @Awhadspeaks
भुरट्या गुंडगिरीचे समर्थन करणारच. मागे दिल्लीत एका तरुणाने पवारांना हाणले होते ते आव्हाड विसरलेले दिसतायत. त्याचेही समर्थन करा आता. pic.twitter.com/NPH5OmYw1T— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 13, 2020
दरम्यान महाराष्ट्रात कंगणा रनौत आणि सुशांतसिंह प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकार बँकफूटवर गेले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपने या प्रकरणावरुन सरकारला लक्ष्य केलं आहे. यावरुन आता सरकारच्या बाजूने काय उत्तर येते हे बघणं महत्त्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- दोनशे रुपये वसूल करूनही लोक ऐकत नाहीत, अखेर या शहरासाठी गृहमंत्र्यांनी घेतलाहा निर्णय
- अहमदनगरचे पालकमंत्री हरवले आहेत; मुश्रीफ म्हणाले, मी गुरुवारी येतोय
- ऐन कोरोनाच्या काळात या आमदार महोदयांना हवाय जनता दरबार, काय आहे प्रकरण ?
- खाजगी रुग्णालयात 30 टक्के खाटा राखीव ठेवा, या मंत्र्यांचे यवतमाळ मध्ये आदेश
- मुख्यमंत्रीसाहेब कोट्यांनी शेतकऱ्यांचं पोट भरत नाही; अनिल बोंडेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

