Share

शिथिलता मिळताच लग्न समारंभात तुफान गर्दी, लातूरात पुन्हा निर्बंध लागू

Published On: 

लातूर : कोरोना रुग्ण संख्या कमी होत असतांना जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले होते. लातूर जिल्ह्याचा समावेश स्तर एक मध्ये होत असल्याने ६ जून पासून ही शिथिलता देण्यात आली होती. मात्र, सुरक्षा नियमांचे पालन करण्याची सक्ती करण्यात आली होती. मात्र, लातूरमध्ये लग्न समारंभाला तुफान गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात लग्न समारंभ आणि अंत्यविधीसाठी पुन्हा निर्बंध लावले आहेत.

या संदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी लग्न समारंभासाठी आधी १०० व्यक्तींची मर्यादा दिली होती. ती कमी करुन आता ५० व्यक्तींची मर्यादा निश्चित केली आहे. तसेच अंत्यविधीसाठी आधी ५० व्यक्ती उपस्थितीची मर्यादा देण्यात आली होती. ती आता २५ व्यक्ती करण्यात आली असल्याचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुध्द दंडात्मक व साथरोग प्रतिबंधक कायदाच्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही आदेशात नमूद केले आहे. कोरोना रुग्ण संख्या कमी झाली असली तरी कोरोना गेलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!