Share

भाजपात अंतर्गत कलह! पक्षातील नेत्याकडूनच तब्बल २१ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Published On: 

बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारे भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार एएच विश्वनाथ यांनी त्यांच्याच सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप लावला आहे. पाटबंधारे विभागाने आर्थिक मंजुरी न घेता घाईत २१,४७३ कोटी रुपयांचा निविदा काढल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच यामध्ये घोटाळा झाला असल्याचा देखील विश्वनाथ म्हणाले.

विश्वनाथ यांनी उघडपणे येडियुरप्पा यांना हटविण्याची मागणी केली असून त्यांचा छोटा मुलगा आणि कर्नाटक भाजप उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. विश्वनाथ पत्रकार परिषदेत म्हणाले, “भद्रा अप्पर कालवा प्रकल्प व कावेरी पाटबंधारे प्रकल्पांशी संबंधित पाटबंधारे विभागात 20 हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे कंत्राट तयार केले गेले आहे. वित्त विभागाकडून कोणतीही आर्थिक मंजुरी घेण्यात आली नाही, मंडळाची बैठक घेण्यात आली नाही. हे घाईघाईने केले गेले.

“ठेकेदाराकडून लाच घेण्याच्या उद्देश्शाने हे केले गेले. कंत्राटदारांच्या हिताचा विचार करणारे हे सरकार आहे का?”, असा प्रश्न एएच विश्वनाथ यांनी यावेळी उपस्थित केला. विश्वनाथ हे विधान परिषद सदस्य आहेत. त्यांनी दोन वर्षांपूर्वी जनता दलातून भाजपात प्रवेश केला. सरकारच्या मंत्र्यांसह संपूर्ण राज्य विजयेंद्र यांच्या प्रशासनात हस्तक्षेपाबद्दल बोलत असल्याचा दावा देखील त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!