Share

‘रेमडेसिवीरचा साठा राजकीय पक्षांऐवजी राज्य सरकारला द्यावा म्हणजे तो गरजूंना देता येईल’

Published On: 

नगर : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर आवश्यक औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने देशातील रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता रेमडेसिविरच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे देशातील तुटवडा कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, रुग्णांची वाढती संख्या व काही परवानग्यांअभावी निर्यात प्रक्रियेतील रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठा साठा अद्यापही कंपन्यांकडेच आहे. यावरून राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

दरम्यान, ‘रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून राज्य सरकार प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारने निर्यातबंदी केली आहे. तो साठा कुठल्या राजकीय पक्षांना नाही तर राज्य सरकारांना द्यावा म्हणजे तो जिल्हाधिका-यांमार्फत गरजू रूग्णांपर्यंत पोहोचवता येईल,’ अशी मागणी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!