Share

…तेव्हा नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? खडसेंच्या कन्येचं भाजपला सडेतोड प्रत्युत्तर !

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली होती. या टीकेला भाजप आमदार राम सातपुते यांनी जोरदार प्रत्युत्तर देत खडसेंवर हल्लाबोल केला. ‘ ‘नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊ बद्दल बोलत आहात. विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार. निष्कलंक देवेंद्रजीवर बोलण्या अगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल.’ असा घणाघात राम सातपुते यांनी केला आहे.’

राम सातपुतेंच्या या टीकेला एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर देत भाजपवर निशाणा साधला आहे. ‘जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही ? तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?आणी असेल तुमच्यात हिंमत तर सिद्ध करा ना ? शामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोँबली? ज्यांचे बद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का म्हणून ते गप्प आहेत ?’ असा प्रहार रोहिणी खडसे यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत – एकनाथ खडसे

सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. तर, एकनाथ खडसे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत. ते ब्राम्हण असले तरी त्यांची सरकार पडणार असल्याची भाकिते खरे ठरतं नाही. सत्ता कधी येईल यासाठी मला वाटतं त्यांना रात्री बेरात्री पण त्यांना स्वप्न पडत असेल, अशी टीका एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर शुभारंभ प्रसंगी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!