दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. मागील काही महिन्यांमध्ये कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्याचे चित्र असतानाच आता कोरोनाचा उद्रेक झाला आहे. राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. यामुळे कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चर्चा करून ६ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढत असल्याने देशात देखील लॉकडाऊन होणार का ? अशा चर्चा सुरु आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून दिल्लीत आज रात्री १० वाजल्यापासून २६ एप्रिल सकाळी ६ वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. ‘आरोग्य व्यवस्थेवर ताण आल्याने लॉकडाऊन करण्यात आला असून येत्या ६ दिवसांमध्ये पुरेशे बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांच्या उपलब्धतेवर भर दिला जाईल,. आम्ही केंद्राच्या सहकार्यासाठी आभार व्यक्त करत आहोत. सर्वांनी नियमावलीचे पालन करावे,’ असं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.
दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने वेळीच संसर्गाची साखळी तोडण्यासाठी योग्य पाऊल उचलणे गरजेचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाच्या मंत्र्यांसह अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून यात ते देशातील स्थितीचा आढावा घेतील. त्यामुळे जरी घाईने लॉकडाऊन लागू करण्याची आवश्यकता नसल्याचे गृहमंत्री अमित शाह म्हणाले असले तरी पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
- …तर विरोधी नेत्यांना देखील रेमडेसिवीरच श्रेय घेता आलं असतं – संजय राऊत
- हि@## भाजपच्या लोकांनी माझ्यासमोर येऊन दाखवावं; आमदार गायकवाडांची पुन्हा एकदा जीभ घसरली
- …तेव्हा नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? खडसेंच्या कन्येचं भाजपला सडेतोड प्रत्युत्तर !
- सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे फडणवीसांना अटक करा – चाकणकर
- पॉईंटमॅनच्या प्रसंगावधानाने वाचला चिमुकल्याचा प्राण; पहा थरारक व्हिडीओ !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

