Share

सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे फडणवीसांना अटक करा – चाकणकर

Published On: 

🕒 1 min read

पुणे : रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यावरुन भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक फार्मा या कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेऊन चौकशी केली.

हे समजताच रात्री उशिरा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यावेळी त्यांची पोलिसांसोबत शाब्दिक वादावादी देखील झाली होती. हे सर्व समोर येताच भाजप आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडू लागल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सोबत उपस्थित असलेल्या नेत्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे. ‘सन्माननीय गृहमंञी, काल रात्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या काही साथीदारांनी मिळून पोलिसांवर दबाव निर्माण करून एका गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता, गुन्हा करणारा जितका दोषी असतो तितकाच दोषी गुन्हेगाराला पाठीशी घालणारा असतो. दोन्ही आरोपींना एकच शिक्षा असते,त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणून त्रास दिल्याबद्धल पोलीसांनी फडणवीस आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करून अटक करावी.’ अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!