Share

बीडमध्ये २८०० रेमेडेसिवीर इंजेक्शन होणार उपलब्ध !

Published On: 

बीड: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कहरामुळे राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली. असे असले तरी रुग्णांची संख्या मात्र वेगाने वाढत असल्याचे चित्र राज्यभरात बघायला मिळत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे गेल्या काही दिवसात बघायला मिळत आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत तसेच ज्या रुग्णांना रेमेडेसिवीर इंजेक्शन गरजेचे आहे अशांना इंजेक्शन वेळेवर मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. मात्र माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात २८०० रेमेडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शने शिल्लक नसल्याचे अनेकांनी फोन करून सांगितल्यामुळे दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेऊन थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना संपर्क साधूनरेमडेसिवीर उपलब्ध करून देण्याची विनंती केली त्यानुसार आता २८०० रेमडेसिवीर उपलब्ध होत असून मंगळवारी १२०० आणि बुधवारी १६०० इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती क्षीरसागर यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे.एकाच महिन्यात दस पट रुग्ण संख्या आढळत आहे. अशा परिस्थितीत जनतेला काळजी घेण्याबाबत आणि सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आरोग्यमंत्री,जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी यांच्या सातत्याने संपर्कात आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!