🕒 1 min read
मुंबई: मध्य प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मान्यता दिली आहे. मध्यप्रदेशमध्ये स्थानिक निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला मान्यता मिळाल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात अनेक चर्चा रंगताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवरच भाजप नेते केशव उपाध्ये (keshav upadhye) यांनी थेट महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
“सव्वा दोन वर्षांपूर्वी न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणासाठी ट्रिपल टेस्ट करा सांगितले होते. मात्र ठाकरे सरकारची ओबीसी आरक्षण देण्याची इच्छाच नव्हती. मंत्री छगन भुजबळ आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नुसत्याच गप्पा मारत होते. मध्य प्रदेशाने मात्र ट्रीपल टेस्ट पूर्ण करतबाजी मारली.”, असे ट्वीट केशव उपाध्ये यांनी केले आहे.
सव्वा दोन वर्षांपूर्वी न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणासाठी ट्रिपल टेस्ट करा सांगितले होते. मात्र @OfficeofUT सरकारची ओबीसीआरक्षण देण्याची इच्छाच नव्हती. @ChhaganCBhujbal @NANA_PATOLE नुसत्याच गप्पा मारत होते. मध्य प्रदेशाने मात्र ट्रीपल टेस्ट पूर्ण करतबाजी मारली.#OBCReservation
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 18, 2022
दरम्यान ओबीसी आरक्षणा संदर्भात ट्रीपल टेस्टची पूर्तता केल्याशिवाय ओबीसी आरक्षण देता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले होते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळं मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने राजकीय वर्तुळात उत्साह दिसून येत आहे. तर इकडे महाराष्ट्रातही यामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. यावर आता राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “शरद पवारांच्या लेन्सेसमधून पाहण्याचं भाग्य…” ; पंकजा मुंडेंचे भाऊ धनंजयबाबत वक्तव्य
- OBC Reservation : “…मग महाराष्ट्राला हा न्याय का लागू होत नाही?”, जितेंद्र आव्हाडांचा सवाल
- OMG..! IPL 2022 गाजवणारा क्रिकेटपटू करणार बॉलिवूड पदार्पण; वाचा कोण आहे तो!
- “भीती वाटत असेल तर अयोध्येला आदित्य ठाकरेंसोबत येऊ शकता”; दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला
- IPL 2022 KKR vs LSG : कोलकाताशी भिडणार राहुलची लखनऊ, काय सांगते हेड टू हेड आकडेवारी? वाचा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
