Share

कृषि पंपाचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई तातडीने थांबवा : बच्चू कडू

Published On: 

मुंबई : राज्यातील विद्युत विभागाची योजना चांगल्या प्रकारे आहे. तथापि, विद्युत विभागाचे कृषीपंपाचे विद्युत कनेक्शन सरसकट तोडण्याची चालू असलेली मोहीम तातडीने थांबवून शेतकऱ्यांना चालू बिल भरण्यासाठी दि. ०१ जून २०२१ ही तारीख निश्चित करून दिलासा द्यावा, अशी मागणी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण,महिला व बाल विकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे पत्र देऊन केली आहे.

आपल्या पत्रात राज्यमंत्री कडू म्हणतात की, राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याचे विद्युत बिल हे एच. पी. पंपानुसार आकारले जाते. शेतकरी वर्षातून १ ते २ हंगामाच्यावेळी विद्युत वाहिनीचा वापर करतात. त्यांना सध्या दिलेले वीजबिल हे चुकीचे असून रद्द करुन त्याचा पुनर्विचार व्हावा.

राज्यात पूर्णवेळ विद्युतवाहिनी वापरणारे शेतकरी दिवसाला ८ तास, महिन्याला एकूण ८ दिवस व वार्षिक ४ महिने वापर होतो. परंतु, विद्युत विभागाने वर्षभराचे एच.पी. नुसार आकारलेले ४० हजार रुपये बिल चुकीचे आहे. त्यामुळे याबाबतीत शासनाने योग्य तो निर्णय घेण्यात यावा.

ते पुढे म्हणतात की, राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे विद्युत बिल ग्रामपंचायत मार्फत भरल्यास शेतकऱ्यांना ३३ टक्के सवलत दिल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल,असेही बच्चू कडू यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!