Share

पुन्हा मूक आंदोलनाची सुरुवात; मराठा समाजाच्या मागणीनंतर संभाजीराजेंची घोषणा

Published On: 

पुणे : मराठा समाजाला अद्यापही आरक्षणाची प्रतीक्षा असून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर मराठा समाज हा आक्रमक झाला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता मराठा समाज हा पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महापूर आणि राज्यातील कोरोनाची स्थिती ओसरल्यानंतर आता मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन करणार आहे.

दरम्यान, आज मराठा क्रांती मोर्चाकडून पुण्यात राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा समन्वयक, विविध मराठा संघटनांचे कार्यकर्ते हे या बैठकीला उपस्थित राहिले. यावेळी मराठा समाजातील व्यक्तींच्या बाजू, भावना ऐकून घेतल्यानंतर संभाजीराजे यांनी पुढील भूमिका जाहीर केली.

कोल्हापूरपासून मूक आंदोलनाची सुरुवात करण्यात आली होती. यानंतर नाशिकमध्ये देखील मूक मोर्चा करण्यात आला. तर, राज्य सरकारने मराठा समाजाच्या असलेल्या काही मागण्या मान्य करून तात्काळ पावले उचलण्याचे आश्वासन दिल्यानंतर संभाजीराजे यांनी मूक आंदोलन स्थगित करत असल्याचे घोषित केले होते. आता दीड महिन्यानंतर संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा मूक आंदोलनाची घोषणा केली आहे.

आजच्या बैठकीत उपस्थित काही युवकांनी नांदेडमध्ये मूक आंदोलन करावे अशी मागणी उचलून धरली. पुढील मूक मोर्चा हा नांदेडमध्येच व्हावा अशी संभाजीराजेंकडे सातत्याने ते मागणी करत होते. तर संबोधन करताना ही मागणी मान्य करत पुढील मूक मोर्चा हा नांदेडमध्येच होईल अशी घोषणा संभाजीराजे यांनी केली. यासोबतच, हा मोर्चा कोणीही कायदा हातात न घेता, कोरोनाचे नियम पाळून करण्यात यावा अशी सूचना देखील त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!