जालना: येणाऱ्या काळात काँग्रेस स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. यावर शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान सेना स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
संजय जाधव यांनी जालन्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात याबाबत विधान केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्हाला स्वबळावर लढायच्या आहेत. निवडून आल्यावर युती होईल न होईल. युती करायची की नाही हा आपला अधिकार आहे. पण उद्याच्या निवडणुका आपल्या ताकदीवर लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी गाव तिथे शिवसेनेची शाखा आणि घर तेथे शिवसैनिक ही मोहीम राबवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सोबतच त्यांनी विधानसभेतही युती होणार नाही असे म्हटले आहे.
दरम्यान खासदार संजय जाधव यांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी आखणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एकवाक्यता ठेवा. एका एका सर्कलमध्ये कुणाला उभं करायचं कोण उभं राहू शकतं. कोण चांगली ताकदवाला आहे. कोण लोकप्रिय आहे. त्या त्या सर्कलमधील लोकांना माहीत असतं. त्यामुळे आतापासूनच तयारी करा. असे त्यांनी शिवसेना पदाधिकार्यांना म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सगळं केंद्राने द्याव मी फक्त घरात बसणार, नाहीतर मर्सिडीज चालवणार’; भाजपची टीका
- रेल्वे प्रवासासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी; मनसेच्या ‘या’ प्रश्नांची उत्तरं सरकार देणार काय ?
- सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्राला बदनाम करण्याचेच कटकारस्थान होते ?
- मराठा आरक्षण : पुण्यात आज राज्यस्तरीय बैठक; संभाजीराजेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
- ‘मोदी सणासुदीला गर्दी होणार असल्याने चिंतेत,तर राज्यातील भाजपनेते मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

