मुंबई : २ जुनपासुन इंग्लंड येथील लॉर्ड्स या मैदानावर इंग्लंड आणि न्युझीलंड या दोन्ही संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी न्युझीलंडचे वर्चस्व राहिले. पहिल्या दिवसाआखेर न्युझीलंडच्या संघाने ८६ षटकात ३ गडी गमावत २४६ धावांची मजल मारली.
या सामन्यात न्युझीलंडकडुन डेवॉन कॉनवेने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मुळचा दक्षिण अफ्रिकेचा असलेला कॉनवे हा न्युझीलंडकडुन कसोटी सामना खेळणारा २८१ खेळाडू ठरला. क्विटंन डिकॉकचा एकेकाळचा सहकारी असलेल्या कॉनवेला दक्षिण अफ्रिकेत पुरेशी संधी न मिळाल्याने चार वर्षापुर्वी न्युझीलंडला आला. स्थानिक क्रिकेटमध्ये तीन वर्षे खेळल्यानंतर कॉनवेने न्युझीलंडसाठी पदार्पण केले.
डेवन कॉन्वेने दणदणीत शतक ठोकत पहिल्याच सामन्यान लॉर्ड्सवर इंग्लंडविरोधात अशी दमदार कामगिरी करत त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला चॅलेंजच दिलं आहे. दोन्ही संघाकडे दमदार फलंदाजीसह गोलंदाजीही तगडी आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार ठरणार. न्यूझीलंड इंग्लंविरोधात सराव सामना खेळून WTC Final पूर्वीची तयारी करत आहे. तर भारतीय संघ विलगीकरणात असून देखील आपली रणनीती तयार करण्यात व्यस्त आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकारने शरियत कायद्यामध्ये हस्तक्षेप केल्याने करोना आणि चक्रीवादळांसारख्या आपत्ती आल्या’
- ‘लसीकरणाबाबत केंद्राची पॉलिसी स्पष्ट नाही; रोज नवीन नियमांची होतेय घोषणा’
- ‘ते ट्विट मी केलं नव्हतं तर…’ सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर महापौरांची सारवासारव
- ‘उद्धवजी… नाकाने कांदे सोलू नका… मराठा समाजाच्या हिताची भूमिका घ्या’
- अंकिता लोखंडेचा चाहत्यांना ‘गुड बाय’ ; पोस्ट शेअर करत दिली माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

