🕒 1 min read
मुंबई: श्रीलंका विरुद्ध झालेल्या मोहाली कसोटी मध्ये रविंद्र जडेजाने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याच्या १७५ धावांच्या शतकानंतर त्याने पाच विकेट्सही पटकावलय त्यानंतर त्याचे सगळीकडून कौतुक होत आहे. क्रिकेट समालोचक आणि माजी भारतीय खेळाडू आकाश चोप्राने रवींद्र जडेजाला कसोटीतील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हटले आहे.
आपल्या युट्युब चॅनेलवर जडेजाचे (ravindra jadeja) कौतुक करताना आकाश चोप्रा (Aakash chopra) म्हणाला “आम्ही आज हे घोषित करतो की जर आपण कसोटी क्रिकेटबद्दल बोललो तर रवींद्र जडेजा हा या क्षणी पृथ्वीवरील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. मी त्याला बेन स्टोक्सपेक्षाही जास्त रेट करतो. जर आपण सध्याच्या परिस्थितीबद्दल बोललो तर, फलंदाज आणि गोलंदाज संपूर्ण पॅकेज म्हणून जडेजा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. फक्त एकच खेळाडू त्याच्या जवळ येतो, मी त्यात कॅमेरॉन ग्रीनची गणना करत नाही, तो चांगला आहे पण तरीही खूप तरुण आहे. मी बेन स्टोक्सबद्दल (ben stokes) बोलत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची गोलंदाजी फारशी चालत नाही, तो एक अष्टपैलू फलंदाज आहे.”
आकाश चोप्राने बेन स्टोक्स आणि जडेजाची तुलना करत पुढे सांगितले “आम्ही म्हणतो की जड्डू घरच्या मैदानावर धावा करतो. बेन स्टोक्सनेही त्याच्या सर्वाधिक धावा त्याच्या क्षेत्रात केल्या आहेत. भारतात आल्यावर तो १५०-१७५ धावा करणार नाही, योगदान असेल पण ते घरच्या मैदानावर तितके महत्त्वाचे असू शकत नाही. जड्डूबद्दलही आपण तेच म्हणतो. त्याने घरच्या मैदानावर १७५, १०० आणि ९० धावा केल्या आहेत आणि जेव्हा तो बाहेर खेळतो तेव्हा ५०-७० धावा शिल्लक राहतात. आणि तो गोलंदाजीत अष्टपैलू आहे तर बेन स्टोक्स फलंदाजी अष्टपैलू आहे. त्यामुळे माझ्या मते रवींद्र जडेजा हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे.”
महत्वाच्या बातम्या
- “केंद्रात तुमचे सरकार आहे म्हणून…”, संजय राऊतांची खोचक टीका
- “…अन् आरोप करायचे पत्रकारांसमोर”, राऊतांच्या पत्रकार परिषदेवर भातखळकरांचा टोला
- पुण्यातील मेट्रोचे श्रेय कोणाचे यावर राजकीय वादावादी सुरू- संजय राऊत
- पाकिस्तानी कर्णधार बिस्माहसाठी स्मृतीने केली विशेष पोस्ट म्हणाली…
- मोदींनी अनावरण केलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा काही भाग कोसळला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
