🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी याच काँग्रेस संसदीय दलाच्या नेतेपदी कायम राहणार आहेत. काँग्रेस संसदीय दलाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड होणार असल्याची चर्चा होती. मात्र, सोनिया गांधी यांची या पदावर निवड करून चर्चेला पूर्णविराम देण्यात आला.
Smt. Sonia Gandhi is elected as leader of Congress Parliamentary Party. She thanks the voters & workers for their faith in the party.
— Congress (@INCIndia) June 1, 2019
लोकसभेत काँग्रेसचा नेता निवडण्यासाठी एक जून रोजी काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात ही बैठक होत आहे. यावेळी पुढील लोकसभेच्या सत्रासाठीची रणनिती ठरविण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. राहुल यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारल्यास त्यांच्याकडे वेगळी जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
