Share

शालेय विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी मनविसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Published On: 

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे शालेय विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांच्या समस्यांसाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी समस्या लवकरात लवकर सोडविण्याच्या संबंधितांना सुचना केल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्ठामंडळाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट घेऊन जिल्ह्यातील CBSE खाजगी शाळांनी शुल्क वसुलीसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करणे, शालेय साहित्य शाळेतून खरेदी करण्यासाठी पालकांवर टाकण्यात येणार दबाव तसेच शिक्षण विभागाकडून, शासन नियम डावलून विद्यार्थी व पालकांची आर्थिक, मानसिक पिळवणूक करणाऱ्या शाळा-संस्थाना शिक्षणाधिकारी पाठीशी कसं घालतात या बाबत सविस्तर निवेदन देण्यात आले.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजवण्याचे सांगून तात्काळ कारवाईस सुरुवात केली असल्याची माहिती मनविसे पदाधिकाऱ्यांनी दिली. या वेळी माझ्यासह मंगेश साळवे, प्रतीक गायकवाड पाटील, गजानन गोमटे उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!