Share

‘पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा, विम्याची मुदत वाढवा’, आ.मेघना बोर्डीकरांचे निवेदन

Published On: 

परभणी : परभणी जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांत जोरदार पाऊस झाला. पालम तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील गळाटी व लेंडी नदीला पूर आल्याने १० गावांचा संपर्क तुटला आहे. तर गंगाखेड तालुक्यातील सुनेगावजवळ इंद्रायणी नदीला पूर आल्याने या भागातील ८ गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे.

दरम्यान, अतिवृष्टीच्या भागातील नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत व पीक विमा भरण्याकरिता मुदतवाढ द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली. भाजप आमदार मेघना बोर्डीकर, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उद्धवराव नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यात ऑनलाईन पीक विमा भरतांना वेळोवेळी साईट बंद होत आहे. त्यामुळे हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहत आहेत. पीक विमा कंपनीचे पोर्टल बंद आहे. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हतबल असून त्यामुळेच पीक विमा भरण्याची रक्कम वाढवून घ्यावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. आमदार बोर्डीकर यांनी कृषी कार्यालयात जावून या सर्व अडचणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

अतिवृष्टीने नुकसान झाल्यास तक्रार नोंदवा
दोन दिवसांपूर्वी परभणी शहर व परिसरात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याची सुरुवात केली असून, विमा भरण्याची अंतिम मुदत दिली आहे. ऑनलाईन तक्रार नोंदवणे शक्य नाही, अशा शेतकऱ्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या जिल्हा, तालुका कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांसह ७२ तासांच्या आत तक्रारीची नोंद करणे आवश्यक आहे. स्थानिक आपत्ती अंतर्गत जोखमीचा धोका घडेपर्यंत पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पिकाच्या लागवडीसाठी झालेल्या निविष्ठांच्या खर्चाच्या प्रमाणात नुकसानभरपाई मंजूर करण्यात येते. तेव्हा नुकसानक्षेत्राची तक्रार विमा कंपनीकडे नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!