Share

‘राज्यात विकास करणारे नाही तर वसुली करणारे सरकार’, बबनराव लोणीकर यांची टीका

Published On: 

जालना : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असणाऱ्या भाजपा सरकारने समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. विविध विकासकामांसाठी सर्वाधिक निधी मिळाला. पण आता महाराष्ट्रात विकास करणारे नाही तर केवळ वसुली करणारे सरकार आहे, अशी टीका माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली.

मंठा तालुक्यातील केंधळी, केदारवाकडी, पेवा व ढोकसाळ या गावांना जोडणाऱ्या डांबरीकरणाच्या रस्त्याचे उदघाटन आ. लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विकासकामांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले. ‘फडणवीस सरकारच्या काळात आ. लोणीकर यांनी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करून रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळवली’ असा दावा त्यांनी केला.

मागील पंचवार्षिकमध्ये आपल्या मंत्रिपदाच्या काळात आपण परतूर विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी विविध माध्यमातून निधी आणला. सध्याचे राज्य सरकार प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न करत असून स्वतः मात्र काहीही करत नाही. मागील पाच वर्षात सुरळीत झालेली घडी पुन्हा विस्कटून टाकण्याचे आणि विकासाऐवजी केवळ वसुली करण्याचे काम वर्तमान राज्य सरकार करीत असल्याची टीका लोणीकर यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!