परभणी : संपूर्ण देशात लसीकरण सुरु आहे. जनजीवन सुरळीत होत आहे. हजारो लोक रस्त्यावर बिनधास्त वावरत आहेत. शेकडो लोकांच्या साक्षीने लग्नसोहळे पार पाडले जात आहेत. हॉटेल, मॉल्स, दारूची दुकाने सुरु आहेत. पण पंढरीच्या वारीवरच निर्बंध का? कोरोना नियमाच्या अडून वारकऱ्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांतमंत्री अनंत पांडे यांनी केला. परभणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
साडेसातशे वर्षाची परंपरा असलेल्या पंढरपुरच्या आषाढी वारीला सलग दुसऱ्या वर्षीही राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. हा तमाम हिंदूंच्या आस्मितेवर घाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने पंढरपूर वारीस परवानगी द्यावी अन्यथा येत्या १७ जुलै रोजी भजन आंदोलन केले जाणार असल्याची माहिती पांडे यांनी दिली.
मानाच्या सात पालख्यासोबत साधारणपणे ३५० ते ४०० पालख्या पंढरपुरात दाखल होतात. त्यात केवळ एका पालखीमागे तीन ते चार वारकऱ्यांना वारी करु द्यावी, मानाच्या पालखी सोबत ५०० वाऱ्यांना पायी जाण्याची परवानगी द्यावी, दिवसा अडचण होत असेल तर रात्रीची पायी वारी करू द्यावी आदी मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या आहेत.
ज्या वारकऱ्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आणि ज्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आहे, अशांनाच परवानगी द्यावी. कोरोना संसर्गाचा धोका रोखण्यासाठी वारकरी गावाऐवजी माळरानात मुक्काम करतील, परवानगी दिल्यानंतर वारकरी शिस्त पाळणार नाहीत अशी शंका असेल तर राज्याने केंद्रीय फोर्स मागवावा, अशी मागणीही विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांतमंत्री अनंत पांडे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्यात विकास करणारे नाही तर वसुली करणारे सरकार’, बबनराव लोणीकर यांची टीका
- पंकजा मुंडेंनी समर्थकांना समजावले, पण त्यांनी दिलेल्या राजीनाम्यांचे काय झाले?
- एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या; जावई गिरीश चौधरी यांच्या कोठडीत १९ जुलैपर्यंत वाढ
- डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला हायकोर्टाचा दिलासा, घेतला ‘हा’ निर्णय
- ‘मुंबई विमानतळावर ‘आवाज’ हा मराठी माणसाचाच असेल’, मनसेचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
