अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली ९ सप्टेंबरला शासन निर्णय पारित करून माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींना बाळासाहेब ठाकरे मालमत्ता कर माफी योजनेची घोषणा केली. अहमदनगर शहरातील लाभार्थ्यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व विधवा पत्नी मालमत्ता कर माफी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यात रहिवासी असलेले माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींना मिळणार आहे. त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेवर शासनाकडून मालमत्ता करात पूर्णपणे सुट देण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मालमत्ता कर भरण्याची गरज शासन निर्णयानुसार नाही. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकार्यांचे प्रमाणपत्र स्थानिक स्वराज्य संस्थेला सादर करणे आवश्यक आहे.
अहमदनगर महापालिका हद्दीतील व मतदार संघातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व विधवा पत्नी मालमत्ता कर माफी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आ.जगताप यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- मराठा आरक्षणाला स्थगिती नंतर राज्यात होणार सर्वात मोठी पोलीस भरती…
- पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकरांनी टोचले कंगनाचे कान! म्हणाल्या…
- शनिशिंगणापूर येथे प्रशांत गडाख यांनी कोरोना बाधित रुग्णांशी साधला संवाद!
- कांद्याची निर्यात बंदी मागे घ्या, अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल!
- कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावर शरद पवार हेच मार्ग काढतील- आशुतोष काळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

