🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र सरकारने काश्मीरमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकार आता जम्मू-काश्मीरमध्ये दोन रिसॉर्ट बांधणार आहे. त्यामुळे पर्यटनासाठी काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांसाठी ही खुशखबर आहे. या रिसॉर्टचा फायदा मराठी पर्यटकांना होणार आहे.
हा निर्णय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारला आणि जम्मू-काश्मीरमधील राज्यपालांना पाठविण्यात येणार आहे जर याला मांजरी मिळाली तर जम्मू-काश्मीरमध्ये रिसॉर्ट बांधणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असणार आहे. याबाबतची माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना जयकुमार रावल यांनी ‘राज्यातून अनेक पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये जातात. तसेच, अमरनाथ यात्रेसाठीही अनेक भाविक राज्यातून जम्मू-काश्मीरला जातात. त्यामुळे श्रीनगर येथील पेहलगाममध्ये रिसॉर्ट उभारण्याचा विचार आहे. यासाठी तेथील केंद्र सरकारची किंवा खासगी जागा खरेदी केली जाणार आहे अशी माहिती दिली.
तसेच पुढे बोलताना या रिसॉर्टसाठी २ कोटींचा खर्च अपेक्षित असून यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविणार आहे असं विधान रावल यांनी केले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील पर्यटकांमध्ये रक नवीन चैतन्य निर्माण होणार आहे.
- विधानसभेची चुरस वाढणार, ‘आप’ही उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
- युतीचं ठरलं, येत्या दहा दिवसांत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार ?
- युतीचं ठरलं, येत्या दहा दिवसांत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार ?

