Share

विधानसभेची चुरस वाढणार, ‘आप’ही उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्या दृष्टीने प्रत्येक राजकीय पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर आता आम आदमी पार्टीने देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीतील उमेदवारांच्या निवडीसाठी पक्षनेतृत्त्वाने राज्यात निवडणूक समितीची स्थापनाही केली आहे.

आम आदमी पक्षाने शुक्रवारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. ‘आप’ या निवडणुकीत महत्वाच्या ममतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उतरवणार आहे. तसेच या उमेदवारांच्या विजयासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवालसह अनेक नेते प्रचार करणार आहेत.

याबाबत महाराष्ट्रातील पक्षाचे प्रभारी दुर्गेश पाठक म्हणाले की, महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या हितासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पाच वर्षांपूर्वी नागरिकांनी तत्कालीन काँग्रेस सरकराला कंटाळून परिवर्तनासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारला बहुमत दिलं होत. मात्र हे युती सरकार देखील पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असे महाराष्ट्रातील पक्षाचे प्रभारी दुर्गेश पाठक म्हणाले.

दरम्यान विधानसभा निवडणुकीला राज्यात चुरस पाहिला मिळणार आहे. भाजप – सेना युती आणि कॉंग्रेस आघाडी यांच्यामध्ये मुख्य लढत असणार आहे. मात्र वंचित आघाडी, आप, मनसें हे पक्ष या लढतीची रंजकता वाढवणार आहे. लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीने कॉंग्रेस आघाडीला दणका दिला होता.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!