Udayanraje Bhosale | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपची शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरुन राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. यावरुनच भाजप नेते आणि महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आक्रमक भूमीका घेतली आहे. तसेच, त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना देखील पत्र लिहिलं होतं. याच पत्राची आता दखल घेण्यात आली आहे.
उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आजच मला पत्रं आलं. त्यात माझ्या पत्राची दखल घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. हे पत्र राष्ट्रपतींनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवलं आहे, अशी महत्त्वाची माहिती उदयनराजे भोसले यांनी दिली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच, शिवाजी महाराजांचा सतत अपमान केल्या जात आहे. महाराजांनी जी भूमिका घेतली सर्वधर्मसमभावाची होती. त्यामागे सर्वांनी आपल्या राज्यात मोकळा श्वास घ्यायला हवा हीच महाराजांची भूमिका होती. लोकशाहीचा ढाचा त्यांनीच खऱ्या अर्थाने निर्माण केला, आता आपण सर्वजण प्रतिक्रियावादी झालो आहोत. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या सर्वांसाठी दिलं त्यांचा आज अपमान होत आहे. आता आपण सर्वजण काय गप्प बसणार आहोत का?, असं देखील उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांनी अवमानकार विधान केलं. त्यामुळे मलाच नाही तर महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला वेदना झाल्या आहेत. राज्यपालांचं ते विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं आहे, असं उदयनराजे भोसले यांनी पत्रात म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांनावर ठोस कारवाई करणेबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन दिले.@rashtrapatibhvn pic.twitter.com/tCurxhhBBV
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) November 23, 2022
महत्वाच्या बातम्या :
- Hemant Godse | संजय राऊतांची टीका हेमंत गोडसेंच्या जिव्हारी लागली, म्हणाले…
- Chitra Wagh | “उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची हौस फिटली”, चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
- Shahajibapu Patil | …तर बेळगावात घुसून महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करू – शहाजी बापू पाटील
- Uddhav Thackeray | “बेळगावसाठी नवस करायला मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत?”, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सवाल
- Uddhav Thackeray | मिंधे सरकार दिल्लीश्वरांचे पाय चाटण्यातच धन्य ; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

