Share

युतीचं ठरलं, येत्या दहा दिवसांत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: सत्ताधारी भाजप व शिवसेनेकडून इतर पक्षातील नेत्यांना फोडण्याची शर्यत लागली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत युती होणार कि नाही ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे युती शंभर टक्के होणार असा दावा करत आहेत. आता येत्या दहा दिवसांत दोन्ही पक्षांध्ये जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

२०१४ साली ऐनवेळी युती तोडत भाजप – शिवसेना वेगवेगळे लढले होते. सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले. तर मागील साडेचार वर्षे एकमेकांची उणीधुनी काढण्याचे काम झाले होते. परंतु लोकसभा निवडणुकीत दोन्ही मित्रपक्ष एकत्र येत युतीने लढले. त्यामुळे लोकसभेत महाराष्ट्रात एनडीएला घवघवीत यश मिळाले. दरम्यान, आता विधनासभासाठी देखील भाजप – शिवसेना युतीनेच लढेल, असं दोन्ही पक्षातील नेते ठामपणे सांगत आहेत.

या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. त्यामुळे पक्षांतर करून आलेल्या नेत्यांचं काय करायचं हाही प्रश्न या पक्षांसमोर आहे. २३ – १४ सप्टेंबर रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवा दरम्यानचं जागा वाटप निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!