Share

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने निधी द्यावा : आ. राणा पाटील

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने निधी द्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार राणा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. राज्यातील रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने समान वाटा देणे बंधनकारक असताना सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने एका लाखाचीही तरतूद केली नसल्याने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, चंद्रकांत कणे, आनंद कंदले, विनोद गंगणे, प्रकाश मगर, गुलचंद व्यवहारे उपस्थित होते.

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग पंतप्रधानांनी मंजूर केला आहे. यासाठी राज्य व केंद्र सरकारला समान निधी द्यायचा आहे. मात्र विधानसभेत या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना या रेल्वे मार्गाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार असल्याने निधीची तरतूद करण्याची गरज नसल्याचे उत्तर राज्याचा परिवहनमंत्र्यांनी दिले. हा युक्तिवाद चुकीचा असल्याचे आमदार राणा पाटील म्हणाले. ही योजना पुर्णत्वास नेण्यासाठी राज्य शासनाने ५० टक्के वाटा भरावा, असे यावेळी आमदार राणा पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!