Share

‘राज्य सरकारने स्वतःची पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य यंत्रणेत सुधारणा करावी’

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणाबाबत होत असलेल्या कामाची तसेच त्यासाठी राज्य सरकारची प्रशंसा केली, अशा बातम्या आल्या होत्या. या पेरलेल्या बातम्या असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. राज्यात आरोग्य यंत्रणेकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

या संदर्भात प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात ते म्हणलो की, ‘मुंबईसह राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना राज्य सरकारने स्वतःची पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.’

कोरोना स्थितीबाबत माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. मात्र, या बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील कामाचे कौतूक केले असल्याचे वृत्त आले होते. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केलीय. पंतप्रधान कार्यालयाने असे कोणतेच पत्र दिले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!