मुंबई : लग्न म्हणजे भारतीयासाठी एक सोहळाच असतो. लग्नात मुलगा आणि मुली च्या बाजुचे दोन्ही अमाप खर्च करतात. सध्या कोरोनाच्या काळात शासनाने बंधने लादल्यामुळे अनेक लग्न साधेपणाने पार पाडली जात आहे. सरकारने दिलेल्या याच सुचनांचे पालन करत छोट्या पडद्यावरील अभिनेता विराफ पटेलने केवळ १५० रुपयात लग्न करत एक नवा आदर्श स्थापन केला आहे.
स्टार प्लस या वाहिनीवरील ‘नामकरण’ या मालिकेत ‘आशिष’ची भूमिका करणारा विराफ पटेल यांने त्याची मैत्रीण ‘द रायकर केस’ फेम सलोनी खन्ना यांनी अनोख्या पद्धतीने लग्न केले आहे. मुंबईच्या वांद्रे कोर्टात त्यानी रजिस्टर पद्धतीने विवाह केला आहे. मॅरेज रजिस्टरचे १०० आणि फोटोचे ५० रुपये एकुण १५० केवळ इतक्याच खर्चात त्यांनी लग्न केले. यावेळी अंगठी म्हणून रबर बँड तर सलोनीने साडी उधार आणली होती. या सोहळ्याला दोघांच्या कुटुंबीयांनी झुम अॅपद्वारे ऑनलाइन हजेरी लावली होती.
https://www.instagram.com/p/COkori3l51_/
दोघांची ओळख दोन वर्षापुर्वी एका ऑनलाइन कार्यक्रमात झाली होती. यानंतर दोघात मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या लग्नाविषयी विराफने सांगितले की,’लग्नाचा सोहळा किती मोठा आहे यापेक्षा तुमचे नाते किती मजबुत आहे हे महत्वाचे आहे.’ या दोघांच्या या प्रकारे विवाहामुळे त्यांचे चाहते दोघांचे कौतुक करत आहेत. अनेक चाहत्यांनी त्यांना वैवाहीक जिवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- बीड जिल्ह्यातील पाच दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय रद्द
- बुमराहचे फॅन एम्ब्रोस म्हणाले, ‘कसोटीत 400 बळी मिळवण्याची आहे ताकत’
- उगा आता पंतप्रधानांना हात जोडू नका, नियुक्ती पत्रावरुन पडळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी : पाटील
- धारूर तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका!


