🕒 1 min read
जळगाव: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील बहिणाबाई चौधरी यांच्या अध्यासन केंद्रासाठी राज्य शासनाकडून ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला (State Government sanctioned Rs 3 crore for Bahinabai Chaudhary Study Center )असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय जळगाव’ या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.
उदय सामंतयांनी म्हटले की, “राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे धडाडीचे निर्णय घेते आहे. तसेच राज्यात लवकरच संवर्गनिहाय २०८८ प्राध्यापक भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे यापुढे आता कोणत्याही महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी असलेला माणूस प्राचार्यच राहील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे.
तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणादरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान यावेळी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वतीने विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू देण्याच्या मागणीसह इतर ३२ मागण्यांचे निवेदनही उदय सामंत यांना देण्यात आले.
महत्वाच्या बातम्या:
-
‘जोपर्यंत हे तीन पक्ष एकत्र…’; अजित पवारांनी विरोधकांना सुनावले
-
“…तर मला काहीच करावं लागणार नाही”,धमकी देणाऱ्यांना संभाजीराजेंचा इशारा
-
Saba Azad साठी Hrithik Roshan ची पहिली पोस्ट, नात्यावर शिक्कामोर्तब?
-
“धोनीला भेटून माझे स्वप्न पूर्ण झाले”; पाकिस्तानी खेळाडूचे वक्तव्य
-
Saba Azad साठी Hrithik Roshan ची पहिली पोस्ट, नात्यावर शिक्कामोर्तब?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
