🕒 1 min read
औरंगाबाद : राज्यातील प्रत्येक बेघरांना घरे देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्याच पद्धतीने शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी शासकीय क्वॉर्टर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारची सकारात्मक भूमिका आहे, असे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
सिल्लोड शहरातील पंचायत समितीच्या आवारातील जीर्ण झालेले क्वार्टर पाडून याठिकाणी सुसज्ज नवीन वसाहत निर्माण करून देण्यासाठी सत्तार यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी तत्काळ शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नुकतीच शहरातील शेवंताबाई मंगल कार्यालयात ग्रामविकास विभागाअंतर्गत महाआवास योजनेसंदर्भात तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपस्थित शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत असताना अब्दुल सत्तार बोलत होते. ते म्हणाले, कोरोना संकटाची तीव्रता आपण सर्वांनी अनुभवली. हे संकट नव्यानेच ओढवले होते. अशा स्थितीत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता काम केले अशा शब्दात सत्तार यांनी सर्व शासकिय यंत्रणेची प्रशंसा केली.
सिल्लोड शहरातील पंचायत समितीच्या आवारात आरोग्य तसेच पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी शासकीय क्वॉर्टरची निर्मिती करण्यात आलेली आहे. परंतु या वसाहतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून दुरुस्ती अभावी सर्व निवास्थानांची पडझड झाली आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी घरे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात दुसऱ्यांदा तेजी; निर्देशांकाने 51 हजाराचा टप्पा ओलांडला…
- मका खरेदी प्रकरणात तलाठ्याला नोटीस
- संवेदनशील विषयावर आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करण्याचा हा प्रकार चीड आणणारा आहे : मोहोळ
- पतीची आत्महत्या, पत्नीचाही उपचारासाठी नेताना मृत्यू
-
देवेंद्र भुयार अजूनही नाराजच ? राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेच्या व्यासपीठावर लावली हजेरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
