औरंगाबाद : शासनदरबारी अनेक दिवसांपासून प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील तब्बल साडेतीन लाखांहून अधिक चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. आपल्या मागण्यांबाबत तसेच आंदोलनाच्या माहितीचे निवेदन चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या जिल्हा संघटनेने औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
शासकीय कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या सेवा कंत्राटदाराकडे सोपवण्याचे तसेच भविष्यात रिक्त पदे न भरता ती पदे व्यपगत करण्याचे व चतुर्थश्रेणी संवर्ग संपवण्याचे शासनाचे धोरण असल्याचा आरोप यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
राज्यातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी वेळ मागूनही शासनाकडून अद्यापही दखल घेण्यात आली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 27 ते 29 जानेवारीदरम्यान राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती’
- यासंदर्भात मला कल्पना नाही, विश्वजित कदम यांचा ईडी नोटीसीवर बोलण्यास नकार
- राज ठाकरेंचं अटक वॉरंट रद्द मात्र न्यायालयात हजर राहावं लागणार !
- १५ वर्षांपेक्षा जुनी वाहने जाणार थेट भंगारात; प्रदूषण रोखण्यासाठी नितीन गडकरींचं महत्वाचं पाऊल
- आनंदाची बातमी : खेळाडूंना शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षणाकरिता ६० टक्के सहभागाची अट शिथिल करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

