🕒 1 min read
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस पाठवली होती. त्यानंतर ईडीने त्यांची प्राथमिक चौकशी केली आहे. दरम्यान, आता ठाकरे सरकारमध्ये मंत्री असणारे कॉंग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांनाही ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी ईडीने स्वप्नाली कदम यांना समन्स बजावल होतं. त्यानुसार त्या आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ईडी कार्यालयात जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु अद्याप त्या ईडी कार्यालयात आल्या नाहीत. वडील अविनाश भोसले यांच्या मालमत्ता प्रकरणी स्वप्नाली यांची चौकशी होणार आहे.
विदेशी चलन प्रकरणात अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. अविनाश भोसले यांची २७ नोव्हेंबर २०२० रोजी ईडीने तब्बल दहा सात चौकशी केली होती. FEMA या कायद्यांतर्गत चौकशी करण्यात आली होती. यापूर्वी आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील २३ ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या. दरम्यान आता स्वप्नाली कदम यांना इडीची नोटीस आल्याने विश्वजीत कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
यावर विश्वजित कदम यांनी बोलण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात मला कल्पना नसल्याचं स्पष्टीकरण विश्वजित कदम यांनी दिले असून, सध्या यावर मी बोलणार नसल्याचंही कदम म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पुढील काही दिवस आपल्यासाठी आव्हानात्मक; एस.एन.श्रीवास्तव यांचे दिल्ली पोलिसांना पत्र
- १५ वर्षांपेक्षा जुनी वाहने जाणार थेट भंगारात; प्रदूषण रोखण्यासाठी नितीन गडकरींचं महत्वाचं पाऊल
- पाथरी बसस्थानक परिसरातून चार किलो गांजा जप्त
- श्रीतुळजाभवानीच्या दर्शनासाठी गर्दीच्या दिवशी तीस हजार मोफत दर्शन पास देण्याचा निर्णय
- बीड जिल्ह्यात मृतांचे नावे विहिरी दाखवून २० कोटींचा डल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

