मुंबई: भारतीय संघाचा श्रीलंका विरुद्ध कसोटी सामना आजपासून मोहाली येथे सुरु होणार आहे. श्रीलंकेच्या या भारत दौऱ्यावर भारतीय संघाने त्यांना टी २० मालिकेत आधीच क्लीन स्वीप केले आहे. मात्र आज भारतीय संघासाठी एक विशेष दिवस ठरणार आहे. भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat kohli) त्याचा १००वा कसोटी सामना खेळणार आहे. यामुळेच या सामन्यासाठी प्रेक्षकांना मोहाली स्टेडियमवर परवानगी देण्यात आली आहे.
कसोटी फॉरमॅटमध्ये भारत आणि श्रीलंका (india vs srilanka) यांच्यात ४४ सामने झाले आहेत. भारताने २० सामने जिंकले आहेत तर श्रीलंकेने ७ सामने जिंकले आहेत. तर १७ कसोटी सामने अनिर्णित राहिले. भारतीय भूमीवर खेळताना श्रीलंकेने आतापर्यंत कधीही भारताला कसोटी सामन्यात पराभूत केले नाही. त्यामुळे T20 मालिकेप्रमाणेच भारतीय संघ या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतही श्रीलंकेवर वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करताना दिसेल.
मोहालीची पीच बघता नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. स्टेडियमवर प्रथम गोलंदाजी करताना अधिक संघांनी सामने जिंकले आहेत. शिवाय, पहिल्या डावात श्रीलंकेला कमी धावसंख्येवर बाद करून गोलंदाजी करताना त्यांच्यावर दबाव टाकण्याचे भारताचे लक्ष्य असेल. प्रथम फलंदाजी करण्याऐवजी प्रथम गोलंदाजी करण्याचेही श्रीलंकेचे लक्ष्य असेल. त्यामुळे भारतीय संघ हा ऐतिहासिक सामना जिंकत माजी कर्णधार असलेल्या विराट कोहलीला भेट म्हणून देण्यास उत्सुक दिसेल. तसेच भारतीय क्रिकेट रसिकही १०० व्या सामन्यात विराटचा प्रतिक्षीत ७१ वा शतक झळकेल याची आशा करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Maharashtra Budget Session : राज्यपालांनी का सोडले अर्धवट भाषण?
- ‘ऐश्वर्या रॉय-बच्चन’ दिसणार एका हटके भूमिकेत; ‘या’ चित्रपटातून करणार कमबॅक
- वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला जाण्याची गरज नाही; आनंद महिंद्रांचं मोठं ट्विट
- ‘छत्रपतींच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा भव्यदिव्य होणं आवश्यक, अन्यथा…’; राष्ट्रवादीचा भाजपला इशारा
- अभिनेत्री रेणुका शहाणे दिसणार छोट्या पडद्यावर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

