🕒 1 min read
नवी दिल्ली : रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे अनेक विदेशी नागरिक आपल्या मायदेशी परतत आहेत. त्यातच भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम राबवली जात आहे. त्यातच आज सकाळी (४ मार्च) इंडिगोचे विशेष विमान हंगेरीची राजधानी बुडापेस्टहून २१९ भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीत (219 students arrived in Delhi from Ukraine) दाखल झाले आहे.
दरम्यान या विद्यार्थ्यांचे गृहराज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांनी विमानतळावर स्वागत केले. “युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आम्हाला यश येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली तैनात असलेले चार मंत्री खूप मेहनत घेत आहेत. बाहेर काढण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना भारताबद्दल आदर आहे. त्यांनी भारत सरकारचे आभार मानले आणि आनंद झाला.”, असे प्रामाणिक यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान परराष्ट्र मंत्रालय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या समन्वयाने भारतीय विद्यार्थ्यांना वेगाने भारतात परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पुढील दोन दिवसांत ७,४०० हून अधिक लोकांना विशेष विमानांद्वारे आणले जाण्याची अपेक्षा आहे. याशिवाय ५ मार्च रोजी ३९०० हून अधिक लोकांना परत आणले जाण्याची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला जाण्याची गरज नाही; आनंद महिंद्रांचं मोठं ट्विट
-
‘छत्रपतींच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा भव्यदिव्य होणं आवश्यक, अन्यथा…’; राष्ट्रवादीचा भाजपला इशारा
-
केळी उत्पादक होणार आता मालामाल; शेतकरी मित्रांनो हा दुहेरी फायदा वापरून पहाच..
-
कोठडीत वाढ केल्याप्रकरणी नवाब मलिकांचे वकील म्हणाले, ‘…ईडीला गृहपाठाची गरज’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
