🕒 1 min read
मुंबई: भारतीय संघाचा श्रीलंका विरुद्ध कसोटी सामना आजपासून मोहाली येथे सुरु होणार आहे. श्रीलंकेच्या या भारत दौऱ्यावर भारतीय संघाने त्यांना टी २० मालिकेत आधीच क्लीन स्वीप केले आहे. मात्र आज भारतीय संघासाठी एक विशेष दिवस ठरणार आहे. भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली त्याचा १००वा कसोटी सामना खेळणार आहे. यामुळेच या सामन्यासाठी प्रेक्षकांना मोहाली स्टेडियमवर परवानगी देण्यात आली आहे. प्रेक्षकांना स्टेडियमवर परवानगी मिळताच तिकिटांच्या विक्रीला वेग आला होता.
विराट कोहलीचा (virat kohli) १०० वा कसोटी सामना, जो दोन सामन्यांच्या भारत श्रीलंका (india vs srilanka) कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना असेल, मोहाली येथील आयएस बिंद्रा PCA आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. २७,००० सीटर क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेसाठी जवळपास पूर्णपणे भरला गेला आहे. . गुरुवारी सायंकाळपर्यंत, एकूण १३,३०० तिकिटे/पास चाहत्यांना विकले गेले आणि दहा ब्लॉक्ससाठी सदस्य आणि कॉर्पोरेट सदस्यांना जारी केले गेले आहे.
बीसीसीआयने (BCCI) कोरोनाची स्थिती पाहता आधी प्रेक्षकांना मोहालीवर सामना पाहण्याची परवानगी दिली नव्हती. मात्र विराट कोहलीचा १००वा कसोटी सामना पाहता यावा यासाठी चाहत्यांनी आवाहन केल्यानंतर बीसीसीआयने या ऐतिहासिक क्षणाला विराटचे चाहते त्याला प्रत्यक्ष पाहू शकतील याची परवानगी दिली. विराटची आई सरोज कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका देखील एका बॉक्समधून ऐतिहासिक कसोटी सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पीसीएच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Operation Ganga: २१९ विद्यार्थी युक्रेनहून दिल्लीत दाखल
- IND vs SL: भारताचा श्रीलंका विरुद्ध पहिला कसोटी सामना आजपासून रंगणार ; विराट कोहलीसाठी ऐतिहासिक दिवस
- Maharashtra Budget Session : राज्यपालांनी का सोडले अर्धवट भाषण?
- ‘ऐश्वर्या रॉय-बच्चन’ दिसणार एका हटके भूमिकेत; ‘या’ चित्रपटातून करणार कमबॅक
- वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला जाण्याची गरज नाही; आनंद महिंद्रांचं मोठं ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
