मुंबई : आज राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशा वेळी मोठ्या खर्चाला कात्री लागण्याची शक्यता आहे. पण जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि अन्य योजनांबाबत चर्चा करण्यासाठी काल मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. गेल्या वर्षी अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा 9 हजार 500 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मांडला होता.
कोरोनाचे संकट, कर्जाचा बोझा, सरकारी तिजोरीतील खडखडाट, कर न वाढवता महसुली तूट कशी भरून काढण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांपुढे असणार आहे. त्यातच जनतेलाही या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा असल्याने त्यांना ते कसा आणि काय दिलासा देणार याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. राज्य सरकार अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील कर काही प्रमाणात कमी करून राज्यातील जनतेला दिलासा सरकार देणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- आमदार संभाजी पाटील निलंगेकरांचा “हा” व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
- ‘तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही तुम्ही थेट…’; राज ठाकरेंचा ‘स्त्रीशक्ती’ला मोलाचा सल्ला
- घाटीच्या ‘या’ सुपर उद्देशाला बसला कोरोनाचा फटका
- बसमधून प्रवास करत असाल तर सावधान! दोन महिलांनी पळवले अडीच लाखांचे दागिने
- शाहिद आफ्रिदीचा जावई ‘हा’ स्टार क्रिकेटपटू ; आफ्रिदीची मुलगी अडकणार लवकरच लग्नबंधनात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

