Share

आमदार संभाजी पाटील निलंगेकरांचा “हा” व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Published On: 

लातूर : निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजी पांटील निंलगेकर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये ते हुर्डा पार्टाचा आनंद घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सध्या सर्वत्र ट्रेंड होत असलेल्या “ये मै हू, और ये पार्टी हो रही है” या फॉर्मॅटमध्ये त्यांनी स्वत: हा व्हिडिओ बनवून ट्विटरवर पोस्ट केला आहे. “ये हम है, ये हमारा हुरडा है और ये हमारी हुर्डा पार्टी हो रही है” असे म्हणत त्यांनी हा हुर्डा पार्टीचा व्हिडिओ तयार केला आहे. त्यांच्या या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.

आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी हा व्हिडिओ ट्विट करताना “आम्ही शेतकऱ्यांची लेकर.. कष्ट करून, पिकांची काळजी घेण्यासाठी दिवसरात्र राबून जेंव्हा आमच्या ज्वारीत दाणे भरू लागतात त्याचा आनंद निराळाच असतो.. तरुणाईचा “ट्रेण्ड” आम्हीपण “फॉलो” करतो.. पण खास आमच्या “स्टाईल”ने..!”, असे लिहित त्यांनी शेतकरी असल्याचा अभिमान व्यक्त केला आहे.

 

या व्हिडओपासून सुरू झाला ट्रेंड
पाकिस्तानमधील  या तरूणीने हा व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर या ट्रेंडला सुरुवात झाली. बॉलिवृडमधील अनेक सेलेब्रीटींनी या ट्रेंडमध्ये व्हिडिओ बनवले आहेत. या तरूणीने पोस्ट केलेल्या व्हिडिओवर अनेक मिम्स देखील बनवले गेले आहेत. सध्या अनेक क्षेत्रातील लोक या ट्रेंडनुसार व्हिडिओ बनवत आहेत. भारतातील एका संगितकाराने तर हा व्हिडिओ घेऊन एक मॅशअप गीत देखील बनवले आहे.

https://www.instagram.com/p/CK9JmaXBEtc/?utm_source=ig_embed

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!