Share

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदान केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांनी वाटले मास्क

Published On: 

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १८ जागांसाठी आज मतदान पार पडले. यावेळी अनेक ठिकाणी उमेदवार आणि मतदारांची मोठी गर्दी जमा झाली होती. यात अनेकजण विना मास्क होते. सकाळी साडेदहा वाजता मतदान विभागीय सहनिबंधक कार्यालयात येथील मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विनामास्क धारकांना मास्क देत नियम पाळण्यास सक्त ताकीद दिली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १८ जागांसाठी सकाळी आठ वाजेपासून मतदान सुरुवात झाले आहे. मतदान केंद्रावर मतदारांचा उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. अनेक जण विनामास्क दिसत होते.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १८ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील दहा सेंटरवर मतदान प्रक्रिया पार पडली. औरंगाबाद येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयात दोन मतदान केंद्र असून त्या मतदान केंद्रावर लोक रांगा लावून व फिजिकल डिस्टन्स पाळत मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात एक हजार ११४ मतदार आहेत.

शहरातील मतदान केंद्रास जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त यांनी संयुक्त भेट दिली यावेळी प्रवेश करताच काही उमेदवारांनी मास्क लावलेला नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना मास्क लावा फिजिकल डिस्टन्स ठेवा असे खडे बोल सुनावले. मतदान केंद्राबाहेरील दोन्ही बाजूस उभी असलेल्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनीही मास्क न घातल्यामुळे संतप्त झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना चांगलेच सुनावत त्यांच्याजवळ असलेले मास्क वाटप केले.

मास्क न वापरल्यास पाचशे रुपये प्रति दंड वसूल करा असे आदेश पोलिस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मतदानासाठी रांगेत उभे असलेल्यांना फिजिकल डिस्टन्स ठेवण्याची ही सूचना पोलिस आयुक्तांनी केल्या.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!