Share

नियमाचं उल्लंघन करणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यांचे दुकान सील करणार : सुनील चव्हाण

Published On: 

औरंगाबाद : वाळूज परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या दारू विक्रेत्यांच्या दुकानावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी धडक भेट देऊन दुकान सील करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोरॊना कार्यकाळात कोरॊना नियमावली डावलून दुकानातून अवैधरित्या दारूची सर्रास विक्री केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांना मिळाली होती.

रविवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण वाळूज परिसरातील आरोग्य केंद्राची पाहणी करण्याकरता गेले असता परत येत असताना अवैध दारू विक्री करणाऱ्या दुकानाला धडक भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान दुकान तात्काळ सील करण्याच्या सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले, गंगापूर तालुक्याचे तहसीलदार अविनाश शिंगटे, मंडळ अधिकारी गायकवाड, वाळूज पोलीस स्टेशनचे एपीआय विनायक शेळके, आदींची उपस्थिती होती. काेरोनाच्या काळामध्ये खुप मोठ्या प्रमाणात  अवैध दारु विक्रीचे प्रमाण खुप वाढले आहे.

त्यामुळे नागरिकांच्या जिवासह वाहतुकीला खुप मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेत आहेत. तर या जिल्हाधिकारी यांनी केलेल्या कारवाईमुळे परसिरातील अवैध दारुची विक्री करणाऱ्यांना चांगलाचा चोप बसला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर कोरोनामध्ये सर्व लॉकडाऊन असतानाही हे चोरटी वाहतुक करणार कश्याप्रकारे दारुची विक्री करत आहेत. या बद्दल देखील शंका व्यक्त करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!