Share

‘गर्भवती महिलांसाठी लसीकरण सुरू करा’, शिवसेना खा.प्रियंका चतुर्वेदी यांचे आरोग्यमंत्र्यांना पत्र

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने गर्भवती आणि स्तनदा महिलांना लस देण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे भारतातही अशा महिलांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात यावी, अशा मागणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. यासंदर्भात चतुर्वेदी यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहिले आहे.

पत्रात लिहिलेय की, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये गर्भवती महिलांसाठी धोका वाढला आहे. सामान्य महिलांच्या तुलनेत गर्भवती महिलांमध्ये मृत्यूचा धोका ७० टक्के इतका आहे. १९ मे २०२१ रोजी केंद्र सरकारने स्तनपान करणाऱ्या महिलांच्या लशीकरणासाठी परवानगी दिली होती. पण फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रीक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया आणि नॅशनल टेक्लिनकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन या संघटनांनी सांगितल्यांतरही गर्भवती महिलांच्या लसीकरणाचा निर्णय पुढील विचारविनिमयासाठी थांबवून ठेवण्यात आला आहे.

लसीकरण प्रक्रियेत गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना सामावून घेतल्यास केवळ त्यांच्या जीविताचा धोकाच कमी होणार नाही तर जन्म घेणाऱ्या आणि नवजात बाळांनाही कमी जोखमीचा सामना करावा लागेल. मला आशा आहे की माझ्या या मागणीचा विचार केला जाईल’ अशी विनंती प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्राद्वारे आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना केलीय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!