Share

‘क्या हुआ तेरा वादा?’, चित्रा वाघ यांच्याकडून जयंत पाटलांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी सहा वर्षांनंतर उठविण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी त्याबाबतचा निर्णय घेतला. दारूबंदीमुळे अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारी जिल्ह्यात बोकाळली होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समर्थन राज्य शासनाने केले आहे. पण या निर्णयाला विरोध होतोय. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना त्यांच्या एका जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. ‘क्या हुआ तेरा वादा…जयंतरावजी, यवतमाळमधील दारूबंदीचं काय झालं?’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

चित्रा वाघ यांनी जयंत पाटील यांचा राज्यातील भाजपची सत्ता असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी सरकार आल्यावर यवताळला दारुबंदी करू असं आश्वासन दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावर या आश्वासनाचं काय झालं असा सवाल करताना चित्रा वाघ यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे. यवतमाळ राहिलं दूर, चंद्रपुरची दारूबंदी उठवली तुमच्या सरकारनं असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. महिलांना कमी समजू नका. अजूनही आमच्या भावनांशी असचं खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चुल फुंकायची वेळ येईल, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.

विधानसभेत यवतमाळच्या दारूबंदीवर जयंत पाटील बोलताना दिसत आहेत. आमचं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या यवतमाळ जिल्ह्याची दारुबंदी करू. हे आश्वासन मी त्यांना दिलं आहे, लिहून घ्या. चंद्रपूरला दारुबंदी होते, त्या महिलांचा साधा प्रश्न आहे की यवतमाळला का होत नाही? आणि सुधीरभाऊ राज्याचे अर्थमंत्री असताना दारुबंदी का होत नाही? असा सवाल पाटील यांनी केला होता. त्याचीच आता आठवण करून देत चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!