🕒 1 min read
मुंबई : नाशिकच्या परिवहन विभागातील निलंबित अधिकाऱ्याने राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरुन जोरदार राजकारण पेटलं असताना आता खुद्द अनिल परब यांनी या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
‘निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर पाच अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक येथे दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे’ असं परब यांनी म्हटलं आहे. ‘विभागातील अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे’ असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.
विभागातील अनेक तक्रारीच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे.
— Anil Parab (@advanilparab) May 29, 2021
‘मंत्र्यांवर आरोप करुन राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही असे भासवून उच्च न्यायालयामार्फत सीबीआय चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मलिन करणे, या राजकीय हेतून केलेली ही तक्रार आहे’ असं ट्विट अनिल परब यांनी केलं आहे.
मंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही असे भासवून उच्च न्यायालयामार्फत CBI चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मालिन करणे, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे.
— Anil Parab (@advanilparab) May 29, 2021
काय आहे प्रकरण?
गजेंद्र पाटील यांनी १६ मे रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ते नाशिक येथे मोटार वाहन निरिक्षक होते. पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी आता या तक्रारीची दखल घेत, सखोल चौकशी करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांना दिले आहेत. उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे परिवहन विभागाच्या राज्यभरातील बदल्या मॅनेज करतात, त्यासाठी कसे अर्थपूर्ण व्यवहार चालतात, त्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे बजरंग खरमाटेना संरक्षण देतात, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आगे आगे देखो होता है क्या! आता जितेंद्र आव्हाडांचा नंबर’, किरीट सोमैय्यांचा इशारा
- शाहू महाराज-बाबासाहेब एकत्र येऊ शकतात, मग प्रकाश आंबेडकर आणि मी का नाही?-खा.संभाजीराजे
- ‘मोदींनी विकासाच्या नावाखाली देश भकास केला’
- ‘क्या हुआ तेरा वादा?’, चित्रा वाघ यांच्याकडून जयंत पाटलांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
- ‘संभाजीराजेंची अवहेलना भाजपच्या अंगाशी येणार’, शिवसेना खासदाराचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
