Share

‘आगे आगे देखो होता है क्या! आता जितेंद्र आव्हाडांचा नंबर’, किरीट सोमैय्यांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : ‘सचिन वाझेवर झालेल्या कारवाईत पाच अधिकारी निलंबित झालेत. परमबीर सिंग घरी गेले, अनिल देशमुखांना तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. आता अवैध बांधकाम प्रकरणी सध्या अनिल परबांवर कारवाई सुरूये. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा नंबर असेल’ असा दावा भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केला. भाजप ठाकरे सरकारमधला भ्रष्टाचार पूर्णपणे बाहेर काढेल, असंही ते म्हणाले.

सोमैय्या यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मंत्र्यांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. सरकारमधल्या विविध मंत्री आणि शिवसेनेच्या नेत्यांवर यावेळी सोमय्या यांनी गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्यातील सरकारनं खुशाल पाच वर्षे पूर्ण करावी. पण मंत्री आणि नेत्यांकडून होणारे भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम आपण करणार असल्याचे सोमैय्या यांनी सांगितले.

शिवसेना नेते संजय राऊत यांना ५५ लाख रुपये परत करावे लागले आहेत. मुंबईच्या महापौरांनी एसआरए चे गाळे ढापल्याचे उच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे. अनिल परब, अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड आता रांगेत आहेत. त्यामुळं ‘आगे आगे देखो होता हैं क्या’ असे म्हणत सोमय्यांनी कारवाईचे संकेत दिले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!