पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल ठरविल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील विविध राजकीय नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेणे सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मराठा आरक्षणासंबंधी संभाजीराजे हे आज शनिवारी वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.
संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठक पार पडल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संभाजीराजे म्हणाले की, अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांची भेट घ्यायची होती. मला शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर एकत्र येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत? हा भेटीमागचा हेतू होता, असे संभाजीराजे म्हणाले.
राज्यसत्तेशिवाय हा प्रश्न सुटणार नाही
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, चर्चेच्या दरम्यान असं ठरलं की आरक्षणाचा प्रश्न पुढं घेऊन जायचा असेल सत्तेचा गाभा असायला हवा. आरक्षणाचे पुरावलोकन करायचं असेल तर पुनर्विचार याचिका करता येते. पण राज्यसत्ता असेल तर राज्यपालांच्या माध्यमातून देखील आपण पुनरावलोकन करु शकतो. त्यासाठी राज्यसत्ता हवी. राज्यसत्तेशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. आरक्षणासाठी परिस्थिती खूप प्रतिकूल आहे. पण आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं ते म्हणाले.
सरकारला आरक्षणाचा मुद्दा त्रासदायक ठरणार
येणाऱ्या सरकारला आरक्षणाचा मुद्दा हा त्रासदायक ठरणार आहे, हा मुद्दा इतकं डोकं वर काढेल की राज्यसत्ता चालवायलाच कठीण होईल, अशी परिस्थिती आहे, असंही आंबेडकर म्हणाले. मराठा आरक्षणासाठी रिव्हू पिटीशन नाही, तर राष्ट्रपती किंवा राज्यपालांमार्फत रिव्ह्यू करता येईल. म्हणूनच राज्यसत्तेची गरज आहे. राज्यसत्ता असेल तर आपण राज्यपालांमार्फत रिव्हू मागू शकतो आणि कोर्टाच्या अडचणीवर मात करु शकतो. हा एक मार्ग मला दिसत असल्याचंही आंबेडकर यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदींनी विकासाच्या नावाखाली देश भकास केला’
- ‘क्या हुआ तेरा वादा?’, चित्रा वाघ यांच्याकडून जयंत पाटलांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
- ‘संभाजीराजेंची अवहेलना भाजपच्या अंगाशी येणार’, शिवसेना खासदाराचा इशारा
- ‘ठाकरे सरकारने जनगणना करून ओबीसींना पूर्ववत आरक्षण द्यावे’, भाजप ओबीसी मोर्चाची मागणी
- चा मराठा आरक्षणाला विरोध’‘धनंजय मुंडे यांच्यामुळेच मी राजकारणात आले!’, पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
