Share

माजी खासदारांना सोबत घेवून केंद्रीय पथकाची आरोग्य सुविधा केंद्रासाठी जागेची पाहणी

Published On: 

औरंगाबाद : केंद्र सरकार पुरस्कृत केंद्रीय आरोग्य सुविधा केंद्र (CGSH) शहरात मंजूर झाले आहे. त्यासाठीच्या जागेची पाहणी दिल्लीवरुन आलेले डॉ. ओम बोडके यांनी केली. या वेळी त्यांच्यासोबत माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच महापौर नंदकुमार घोडेले उपस्थित होते. या केंद्रासाठी आकाशवाणी केंद्र तसेच गारखेडा परिसरातील जागेची पाहणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप जागेसंदर्भात अंतीम निर्णय झालेला नाही.

माजी खासदार तसेच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी हे आरोग्य सुविधा केंद्र मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला असल्याचा दावा केला आहे. त्या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबत त्यांनी केलेला पत्रव्यवहार देखील सर्वांना माहिती आहे. त्यातच कोरोनासारख्या महामारीच्या काळात शहरातील आरोग्य सुविधा वाढवण्याची गरज लक्षात आली. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांसाठी हे आरोग्य केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होईल.

मात्र, शहरात विद्ममान खासदार असताना त्यांच्या अनुपस्थितीमध्ये केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती सर्वांच्या भुवया उंचवणारी ठरली आहे. जिल्ह्यातील राजकारणात एमआयएम विरुद्ध शिवसेना हे चित्र कायमच दिसून आले आहे. त्यात आता या आरोग्य केंद्राच्या बाबतीतही तसे चित्र दिसायला नको, एवढीच अपेक्षा.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!