Share

‘लोकल सुरु करा ; मुख्यमंत्री Work From Home करू शकतात, पण…’

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्यापासून राज्यात पुन्हा निर्बंध कडक केल्यानंतर मुंबई लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली होती. आता जनजीवन पूर्वपदावर येत असून कोरोना स्थिती देखील आटोक्यात येत आहे. त्यामुळे लोकल प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना मिळावी अशी मागणी मागील महिनाभरापासून जोर धरू लागली आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. आज तरी जनहिताचे निर्णय करणार का? असा सवाल विचारला आहे. मुख्यमंत्री Work From Home करू शकतात, पण मुंबईकरांना ऑफिसला जावेच लागते. लोकल प्रवास बंदीमुळे जनतेत असंतोष आहे असं देखील म्हटलं आहे. केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

‘आज उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाची बैठक आहे. आज तरी जनहिताचे निर्णय करणार का? मुख्यमंत्री Work From Home करू शकतात, पण मुंबईकरांना ऑफिसला जावेच लागते. लोकल प्रवास बंदीमुळे जनतेत असंतोष आहे. उद्रेक होण्यापूर्वी राज्य सरकारने तातडीने निर्बंध शिथिल करून लोकल प्रवास सर्वांसाठी सुरू करावा.’ असे उपाध्ये यांनी त्यांच्या ट्वीट मध्ये सांगितले आहे.

दरम्यान सध्या राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने कमी होत असतानाही राज्य सरकारने लादलेले निर्बंध कायम असल्याने सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, नोकरदार अक्षरश: वैतागले असून हे निर्बंध तातडीने शिथिल करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. निर्बंधांना न जुमानता व्यवहार चालू करण्याशिवाय आता पर्याय नाही, अशी भावना जनमानसात वाढीस लागत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!