Share

१४ जिल्ह्यांत निर्बंध होऊ शकतात शिथिल, मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर

Published On: 

मुंबई: राज्यातील १४ जिल्यातील कोरोना निर्बंध शिथिल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. दोन दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत विधान केले होते. त्यानुसार आरोग्य विभागाकडून कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा संपूर्ण प्रस्ताव मांडला गेला आहे.

राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी ज्या १४ जिल्ह्यांमध्ये तीन आठवड्यांपेक्षा जास्त सक्रिय रुग्णदर एक वा त्यापेक्षा कमी आहे अशा जिल्ह्यांची यादी तयार करून ती सादर करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनावरील प्रभावी उपाययोजना कशाप्रकारे करता येतील याचा आढावा आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे.

राज्यातील कोरोना रुग्णवाढ दर हा ४.५ टक्के आहे. निर्बंधाचे पालन केल्यास हा दर आटोक्यात येऊ शकतो. तसेच राज्यात सध्या ४००० हून अधिक केंद्रांमधून लस दिली जात असून दिवसाला १२ लाख लोकांचे लसीकरण करण्याची आपली क्षमता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात आतापर्यंत २ कोटी नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून सादर केलेला प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!